शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

महिला दुहेरीत विल्यम्स भगिनींची बाजी

PR
सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीपाठोपाठमोठी बहीण व्हिनसच्या साथीने महिला दुहेरीचेही अजिंक्यपद जिंकले. सेरेना आणि व्हिनस या अग्रमानांकित जोडीने झेक प्रजासत्ताकच्या आंद्रिया हलावाचकोवा आणि लूसी हरादेका या जोडीचा ७८ मिनिटे चाललेल्या लढतीत ७-५, ६-४ असा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. एकेरीत पहिल्याच फेरीत गारद झालेल्या व्हिनसने सलग ११ वेळेस बिनतोड सर्व्हिस करताना १0 मिनिटे या निर्धारित वेळेआधीच ही लढत जिंकली.