गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: जोहान्सबर्ग , शुक्रवार, 25 जुलै 2014 (14:52 IST)

महेंद्रसिंग धोनी जगातील श्रीमंत अँथलिट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मौल्यवान अँथलिटमध्ये    पाचव्या स्थानावर आहे, असा अंदाज फोर्बस मासिकाने दिला आहे.
 
टेनिसपटू रॉजर फेडरर, गोल्फ खेळाडू टायगर वुडस्, लेबरॉन जेम्स, फिल मिकेलसन आणि टेनिसपटू मारिआ शारापोव्हा यांच्यानंतर धोनीचा पाचवा क्रमांक लागत आहे. धोनीच्या नावावर 21 दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती दाखविण्यात आली आहे.
 
स्वीसचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेचा वुडस यांची संपत्ती धोनीपेक्षा डबल आहे. बास्केटबॉलपटू लेबरॉन जेम्स याचा तिसरा क्रमांक   लागतो. फेडररने 17 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. वुडस्ने 14 प्रमुख गोल्फ विजेतेपद मिळविले आहे. जॅक लिकलावून याच्या नावावर 18 विजेतेपदे आहेत. 
 
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी क्रिकेट कर्णधार आहे. अद्यापि तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्याने भारताला ट्वेंटी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे. तिहेरी यशानंतर त्याने 28 वर्षानंतर भारताला लॉर्डस् मैदानावर इंग्लंडविरुध्द ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
 
आघाडीचे दहा मौल्यवान अँथलिट असे : 
 
1. रॉजर फेडरर (टेनिस, स्वीस) व टागर वुडस् (गोल्फ, अमेरिका)- प्रत्येकी 46 दशलक्ष डॉलर, 
 
2. लेबरॉन जेम्स (बास्केटबॉल)- 27 दशलक्ष डॉलर्स, 
 
3. फिल नेकेलसन (गोल्फ)- 25 दशलक्ष डॉलर, 
 
4. मारिया शारापोव्हा (टेनिस, रशिया)- 23 दशलक्ष डॉलर, 
 
5. महेंद्रसिंग धोनी (क्रिकेट, भारत)- 21 दशलक्ष डॉलर, 
 
6. उसेन बोल्ट (ट्रॅक अँण्ड फिल्ड, जमेका)- 20 दशलक्ष डॉलर, 
 
7. कोबे ब्रांट (बास्केटबॉल)- 19 दशलक्ष डॉलर, 
 
8. ली ना (टेनिस, चीन)- 15 दशलक्ष डॉलर, 
 
9. ख्रिस्तिनो रोनाल्डो (फुटबॉल, पोतरुगाल)- 13 दशलक्ष डॉलर, 
 
10. लिओनेल मेस्सी (फुटबॉल, अर्जेटिना) 13 दशलक्ष डॉलर.