गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

मुंबई इंडियन्स इतर खेळांच्या आखाड्यात

FILE
क्रिकेटबाहेर विस्तार करताना मुंबई इंडियन्सने मुंबईतील ११९ वर्ष जुन्या मुंबई स्कूल क्रिडा संघासोबत हात मिळवला आहे. याअंतर्गत २० खेळांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल, असे मालक नीता अंबानी यांनी सांगितले.

हा सहकार्य वरिल क्रिडा संघटनेद्वारा संचालित सर्व २० खेळांसाठी आहे. देशात इतर खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने मुंबई इंडियंसचे हे पाऊल असल्याचे अंबानी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

सहय्योगाअंतर्गत पहिल्या टप्प्यात फुटबॉलसाठी ऐस्ट्रोग्रास टर्फ टाकेल. याशिवाय बॅडमिंटन व टेबल टेनिससाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे क्रिडा संघटनेचे अध्यक्ष जूड रौद्रिगेज यांनी सांगितले.