गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 25 एप्रिल 2016 (12:03 IST)

मेरी कोमला आश्चर्याचा धक्का

राज्यसभेतील नामनियुक्त सदस्यपदासाठी नामांकन मिळाल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला. परंतु सध्या आपल्याकडे या नवीन भूमिकेविषयी विचार करयला वेळ नाही कारण आपले लक्ष ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणे हेच आहे, असे ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम म्हणाली. राज्यसभेसाठी नामांकित होणे फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे. परंतु आपण संसदेत खासदारच्या रुपात काय करू, या भूकिकेविषयी विचार करून स्वत:ला दडपणाखाली टाकू इच्छित नाही. मी अजूनपर्यंत ऑलिम्पिक पात्रता मिळविली नाही आणि जोपर्यंत पात्रता मिळवित नाही. तोपर्यंत मी यावर विचार करणार नाही. माझे पूर्ण लक्ष रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रात मिळविण्यावर केंद्रित आहे, असेहीती म्हणाली.