गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: रिओ-द-जिनेरिओ , सोमवार, 14 जुलै 2014 (15:57 IST)

मेसीला 'गोल्डन बॉल' तर 'रॉड्रीगेज'ला गोल्डन बूट'

अर्जेन्टाईन संघाला फिफा विश्वचषकात जर्मनीकडून 1-0 असा  पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अर्जेन्टाईन संघाचा कर्णधार लिओनेल मेसीना या विश्वचषकाच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताब पटकावला आहे. 
 
मेसीने या वर्ल्ड कपमध्ये चार गोल झळकावले. या वर्ल्ड कपमध्ये त्याचीच सर्वोत्तम फुटबॉलर म्हणून अखेर निवड झाली. मेसी हॅमेज रॉड्रीगेज, जर्मनीचा थॉमस मुलर आणि नेमार या तिघांना मागे टाकत गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. 
 
कोलम्बियाचा स्टार फुटबॉलर हॅमेज रॉड्रीगेज यावर्ल्ड कपचा खर्‍या अर्थाने सरप्राईज पॅकेज ठरला. कोलम्बियाच्या या 22 वर्षीय फुटबॉलपटूनं वर्ल्ड कपमध्ये तब्बल सहा गोल झळकावण्याची किमया साधली. आपल्या डेब्यू विश्वचषकाने सर्वोत्तम खेळ करत सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. या विश्वाचषकात सहा गोल झळकावल्यामुळे त्याला 'गोल्डन बूट'च्या पुरस्काराने गौरवण्यात आले.