शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

मोंटे कालरे टेनिस स्पर्धा - नदाल विजेता

स्पेनचा स्टार टेनिस खेळाडू राफेल नदालने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर
WD
असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव करीत मोंटे कालरे मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

राफेल नदालने ७८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत जोकोविचवर ६-३, ६-१ असा विजय मिळविला. नदाल आठ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. हा त्याचा ४७ वा एटीपी किताब असून गतवर्षी त्याने फ्रें च ओपन जिंकल्यानंतर पहिल्यांदाच एखादा किताब आपल्या नावे केला आहे.

अंतिम लढतीत अव्वल मानांकित जोकोविचला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. त्याने अनेक टाळण्याजोग्या चुका केल्या. त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. या स्पर्धेतला नदालचा हा सलग ४२ वा विजय ठरला. त्याने २00५ पासून या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यावेळीही त्याने एकही सेट न गमावता सामना आपल्या नावे करण्यात यश मिळविले. या विजयाबरोबरच नदालने आता फ्रें च ओपनसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे.