गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (10:56 IST)

मोहम्मद असाबला कांस्यपदक

नवी दिल्ली- सायप्रसमधील निकोसिया येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज मोहम्मद असाबने पुरूषांच्या डबल ट्रप नेमबाजीत कास्यपदक मिळविले. कास्पदकासाठीच्या सामन्यात असाबने ब्रिटनच्या टीम नीलचा 30-27 अशा गुणांनी पराभव केला. या क्रीडा प्रकारात ब्रिटनच्या स्टीव्हन स्कॉटने चीनच्या पॅनचा 27-25 असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.