शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

युकी भांबरीची विजयी सलामी

WD
भारताच्या युकी भांबरीने दमदार खेळ करीत न्यूझीलंडच्या डॅनियल किंग टर्नरवर विजय मिळवला. डेव्हिस चषक आशिया ओसनिया जोन ग्रुपच्या रेलीगेशन प्लेऑफच्या लढतीत या विजयाने भारताने १-0 अशी आघाडी घेतली आहे.

वर्ल्ड रॅकिंगमध्ये १७९ व्या क्रमांकावर असलेला युकीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करीत सामन्यात पहिल्या दोन सेट्समधील पराभवानंतर जबरदस्त कमबॅक केला. तीन तास १५ मिनिटे चाललेली ही लढत युकीने ३-६, 0-६, ६-२,६-४,६-२ अशी जिंकली. पावसाच्या व्यत्यायामुळे दीड तास उशिराने सुरू झालेल्या या लढतीत युकीनेही वादळी खेळ करून उपस्थितांची दाद मिळवली.