मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पाकिस्तान हॉकी बाहेर

WD
पाकिस्तान हॉकी संघटनेतील अंतर्गत वादाचा फटका त्यांच्या हॉकी संघाला बसला असून, त्यांना पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. नियोजित वेळेत प्रवेशिका पाठविण्यात उशीर केल्याने त्यांना स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्ताला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.