शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (11:12 IST)

रिओ ऑलिम्पिक, आज उद्घाटन

ललिता बाबर आणि कविता राऊतनंतर अजून एक मराठमोठी खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. सोलापूरमधील बार्शीची टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे महिला दुहेरीत तिची जोडीदार असणार आहे ती टेनिस क्वीन सानिया मिर्झा. यामुळे सानियाबरोबरच प्रार्थनावरही सा-या देशवासियांच्या नजरा खिळल्या असतील. प्रार्थना आता सानियासमवेत भारताला मेडल पटकावून देईल अशी आशा सा-यांना वाटतेय. कारण सानियाचा सध्याचा फॉर्म प्रार्थनालाही चांगली कामगिरी करायला भाग पाडेल असं वाटतय.
 
ब्राझिलच्या रिओ दी जनेरियोमध्ये ऑलिम्पिक रंगणार आहे. क्रीडा जगतातील या मेगा इव्हेंटमध्ये भारताच्या वुमेन पावरकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. अॅथलेटीक्सपासून ते बॅडमिंटनपर्यंत अशा सर्वच स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये भारतीय महिलाराज दिसणार याकडे क्रीडा चाहत्यांचा लक्ष असेल. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, दुत्ती चंद, टिंटू लुका, कविता राऊत, सुधा सिंग, हिना सिद्धू आणि आयोनिका पॉल या भारतीय ऍथलिट रियोमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहेत.
 
रिओ ऑलिम्पिकसाठी भारताचे शंभरहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. भारत एकूण 15 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. तिरंदाजी, ऍथलेटीक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, गोल्फ, जिम्नॅस्टिक, ज्युडो, रोईंग, शूटींग, स्विमिंग, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग, रेसलिंग या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठी टीम ही ऍथलेटीक्सची आहे. शूटिंग, तिरंदाजी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये भारताला मेडल्सची अपेक्षा आहे. दिपिका कुमारी, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, हिना सिधू, मानवजित सिंग संधू, जितू राय, सायना नेहवाल, ज्वालागुट्टा-अश्विनी पोनप्पा, के. श्रीकांत, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे आणि शिवा थापाकडून आपल्याला मेडलची आशा आहे.