बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: बीजिंग , सोमवार, 3 ऑक्टोबर 2011 (14:55 IST)

लि ना पहिल्याच फेरीत पराभूत

फ्रेंच ओपन विजेत्या ली नावर मायदेशातील प्रेक्षकांसमोरच पहिल्या फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवली. चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रोमानियाच्या नख्या मोनिका निक्युलेसने लि नाला 6-4, 6-0 असे पराभूत केले.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या ली फक्त 90 मिनिटात पराभूत झाली. गेल्या वर्षी तिने या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. चीनच्या झँग साऊइ आणि झेंग सायसायही पहिल्या फेरीत गारद झाल्या.