शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: माद्रिद , मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 (12:24 IST)

लियोनेल मेस्सीच्या 4 गोलमुळे बार्सिलोनाचा मोठा विजय

स्ट्रॉयकर लियोनेल मेस्सी याने नोंदवलेल्या चार गोलमुळे बार्सिलोनाने व्हॅलेन्शियावर 5-1 असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात बार्सिलोनाचा संघ पिछाडीवर पडला होता. मात्र मेस्सीच्या धडाक्यामुळे व्हॅलेन्शियाचा बचाव खिळखिळा झाला. या विजयामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना आणि आघाडीवरील रियल माद्रिद यांच्यातील गुण फरक दहाचा राहिला आहे.