शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2015 (10:54 IST)

लिलावात सुशीलच्या तुलनेत योगेश्वरला जादा किंमत

नवी दिल्ली- 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणार्‍या व्यावसायिक साखळी कुस्ती स्पर्धेसाठी मल्लांचा लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये भारताचा ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त आणि सुशीलकुमार यांच्यावर अधिक बोली लावण्यात आली. मात्र या लिलावात सुशीलकुमारच्या तुलनेत योगेश्वर दत्त महागडा मल्ल ठरला.
 
आयपीएलमध्ये नवोदित क्रिकेटपटूंनी करोडो रुपये कमावलेत, मात्र पहिल्या प्रो-कुस्ती लीगच्या लिलावात ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार आणि योगेश्व दत्तची लाखोंमध्ये बोलवणं करण्यात आली. या लिलवात दोन वेळचा ऑलिंपिक पदकविजेता सुशील कुमारपेक्षा (38.20 लाख) ऑलिंपिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तला (39.70 लाख) सर्वाधिक बोली लागली.
 
योगेश्वर आणि सुशीलची आधारभूत किंमत केवळ 33 लाख इतकी होती. आयकॉन असूनही सुशीलला हमी भावापेक्षा केवळ 5.20 तसेच योगेश्वरला 6.70 लाख अधिक मोजण्यात आले. दोघांनाही हरयाणा फ्रँचायझीने करारबद्ध केले. सर्वाधिक बोली लागणार्‍यांमध्ये तिसर्‍या स्थानी युवा कुस्तीपटू नरसिंग यादव आहे. त्याला बंगळूरू फ्रँचायझीने 34.50 लाखांना करारबद्ध केले. 
 
नरसिंगही आयकॉन च्या यादीत आहे. प्रो- कुस्ती लीगच्या लिलावात जवळपास 50 हून अधिक कुस्तीपटूंना बोली लागली. त्यात सहा फ्रँचायझींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कुस्तीपटूंना करारबद्ध करण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला तीन कोटींची मर्यादा ठेवण्यात आली होती.