गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2011 (17:42 IST)

लुईस हॅमिल्टन पहिल्या सरावात अव्वल स्थानी

भारतात प्रथमच ग्रां.पी. फॉर्म्युला वन कार रेस रविवारी होणार आहे. त्यसाठी शुक्रवारी दोन सत्रात जगातील दिग्गज चालकांनी सराव केला. पहिल्या सराव सत्रात मॅक्लॅरनचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने 1 मिनिट 26.836 सेकंदात सर्किटला फेरी मारत सर्वात वेगवान वेळ नोंदवली. त्याच्यापाठोपाठ रेड बुलचा विद्यमान जगज्जेता सेबॅस्टियन वेटेल होता. दोघांमध्ये केवळ सेकंदाचा फरक होता.


शेवटच्या लॅपमध्येच या सेकंदाच्या फरकाचा थरार झाला. तिसर्‍या स्थानावर राहिला. जेसन बटन चौथ्या स्थानावर राहिला. तर प्रेक्षकांचे आकर्षण असणारा फेरारीचा फिलीप मॅसा सातव्या स्थानी होता. मात्र स्थानिक फोर्स इंडियाचा चालक अॅड्रियन सुटील आठव्या स्थानावर आला.