शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

विंबल्डनमधून शारापोवा बाहेर

WD
या वर्षीची विंबल्डन स्पर्धा धक्कादायक पराभवांमुळे व दुखापतींमुळेही गाजत असून फेडररप्रमाणेच स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल व रशियाच्या मारिया शारापोवा यांनाही स्पर्धेमधून बाहेर पडावे लागले आहे. पोर्तुगालच्या मिशेल लार्चर डी ब्रिटो (जागतिक मानांकन - 131) हिने शारापोवाचा सरळ सेटमध्ये 6-3, 6-4 असा पराभव केला.

याबरोबरच, महिलांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्हिक्‍टोरिया अझारेंका व फ्रान्सचा सहावा मानांकित जो विल्फ्रेड त्सोंगा यांच्यासह सात जणांनी विंबल्डनमधून दुखापतीच्या करणास्तव माघार घेतली आहे.