शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: इंचियोन , शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (10:33 IST)

विजयादशमीच्या दिवशी भारताची 'गोल्डन' कामगिरी

विजयादशमीच्या दिवशी भारतीय क्रीडापटूंनी गोल्डन कामगिरी केली. 17 व्या आशियाई स्पर्धेत भारतीय ‍क्रीडापटूंनी दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. भारताच्या दोन्ही कबड्डी संघांनी अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावून भारताच्या महिला आणि पुरुष संघाने विजयादशमीच्या दिवशी सोने लुटले. भारताने स्पर्धेत 11 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 
 
राकेश कुमारच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने 27-25 ने इराणला धुव्वा उडवला. भारताने सलग सातव्यांदा फायनलमध्ये विजय मिळवला. भारतीय महिला संघाने इराणला 31-21 ने पराभूत केले. भारतीय महिलांनी सलग दुसर्‍यांदा अंतिम सामन्यात विजयश्री खेचून आणली. 
 
इंचियोन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकाचा बहुमान पटकावल्यानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी चाहत्यांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला.