शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2015 (10:21 IST)

विजेंदरची लढत 7 नोव्हेंबर रोजी

नवी दिल्ली- काही तांत्रिक कारणास्तव भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग आणि डिन गिलेनमधील 30 ऑक्टोबर रोजी होणारी व्यावसायिक क्षेत्रातील दुसरी लढत आता 7 नोव्हेंबर रोजी होईल. व्यावसायिक बॉक्सर झाल्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक विजेत्या विजेंदरने पहिल्या लढतीत ब्रिट सोनी व्हाईटिंगचे आव्हान परतवून लावले होते. गिलेन हा मे महिन्यात व्यावसायिक बॉक्सर बनला. त्याने आपल्या पहिल्या लढतीत शॉन व्हाईटवर व त्यानंतर सप्टेंबर महिन्यात लुईस वॅन पेटशवर मात केली होती. विजेंदर हा हरयाणामध्ये पोलीस उपनिरीक्षक आहे तर डिन गिलेन हा नॉटिंगहॅम्पशायरमध्ये अग्निशमन अधिकारी आहे. एक हौशी बॉक्सर म्हणून डिन गिलेनने 2013 मधील विश्व पोलीस आणि फायर फायटर क्रीडा स्पर्धांत सुवर्णपदक पटकावले होते.