शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

विम्बल्डन खुले टेनिस व्हिनस विलिम्सची माघार

WD
पाच वेळा विजेतेपद मिळविणारी अमेरिकेची व्हिनस विलिम्स हिने 24 जूनपासून खेळल्या जाणर्‍या विम्बल्डन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली आहे.

तिला पाठदुखीचा त्रास सुरू आहे. व्हिनसने एकूण 7 ग्रँडस्लॅम मिळविले आहेत. तिने महिला दुहेरीतूनही माघार घेतली आहे. ती सेरेना विलिम्ससह महिला दुहेरीत खेळत असते. व्हिनसने असा मजकूर स्पर्धा संयोजकाला फेसबुकवरून पाठविला आहे. विम्बल्डन स्पर्धेवर मी नेहमीच प्रेम करते. त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेताना मी निराश झाले आहे. परंतु माझाही नाईलाज आहे, असे तिने सांगितले. जगात माजी अग्रमानांकित असलेली व्हिनस ही 8 जुलैपासून वॉशिंग्टन येथे सुरू होणार्‍या टेनिस स्पर्धेत भाग घेणची शक्यता आहे.

ग्रास कोर्टवर खेळल्या जाणार्‍या या ग्रँडस्लॅम स्पर्धेला येत्या मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. व्हिनसने 1997 पासून टेनिस खेळाला सुरुवात केल्यापासून गेली सोळा वर्षे ती सतत विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होत होती. पण यंदा मात्र तिला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. व्हिनस गेल्या अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. गेल्या महिन्यात ओपन स्पर्धेत खेळताना तिला ही दुखापत उद्भवली होती. व्हिनस विलिअम्स सध्या जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानावर आहे. तिची बहीण सेरेना विलिअम्स ही क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिने नुकतेच फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळविले होते.