शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 28 जुलै 2011 (11:34 IST)

वीरधवलने लंडनचे 'तिकीट' बुक केले!

ग्वाँझू एशियाडमध्ये ब्राँझपदकाची कमाई करणारा वीरधवल खाडे लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जलतरण स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह भारताचीही मान उंचावणारा या गुणी जलतरणपटूकडून आता ऑलिम्पिक पदकाचीही अपेक्षा केली जात आहे.

शांघाय येथे सुरू असलेल्या १४व्या फिना जागतिक स्पर्धेतील १०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ५०. ३४ सेकंदात पूर्ण करून खाडेने लंडनचे 'तिकीट' बुक केले. याआधी भारताचा संदीप सेजवालही याच स्पर्धेद्वारे १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीसाठी ऑलिम्पिकला पात्र ठरला. १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीची उपांत्य फेरी गाठण्यात खाडेला यश आले नाही ; पण त्याचा ऑलिम्पिक प्रवेश मात्र निश्चित झाला आहे.