बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

व्हेटेलने रचला इतिहास

ND
जगज्जेत्या रेडबुलच्या सेबॅस्टीयन व्हेटेलने पहिल्या भारतीय ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला वन कार रेस स्पर्धेवर पूर्ण वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर सरावापासूनच त्याने आपला इरादा स्पष्ट केला होता. शनिवारच्या पात्रता फेरीतही वेगवान वेळ नोंदवत त्याने पोल पोझिशन पटकावली आणि रविवारी झालेल्या मुख्य रेसमध्येही त्याने विजेतेपद पटकावले. मॅक्लेरनच्या जेसन बटनने दुसरा तर फेरारीच्या फर्नांडो अलोन्सोने तिसरा क्रमांक मिळवला, व्हेटेलचा या हंगामातील हा 11 वा विजय ठरला आहे. त्याला मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.


फिलीप मॅसा रेस पूर्ण करण्यात अपयशी
फेरारीचा आघाडीचा चालक फिलीप मॅसा पहिली भारतीय ग्रांपी रेस पूर्ण करण्यात अपयशी ठरला. 24व्या लॅपवेळी त्याची लुईस हॅमिल्टनशी धडक झाल्याने त्याने ही रेस सोडून दिली. यावेळी हॅमिल्टन मॅसाच्या बाजून एका वळणावर पुढे जात असताना मॅसा सरळ त्याला येऊन धडकला. त्यामुळे हॅमिल्टन काही क्षण थांबला. मात्र मॅसाने तशीच रेस सुरू ठेवली. परंतु त्याला ही रेस पूर्ण करणे शक्य झाले नाही.