मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: लंडन , गुरूवार, 3 जुलै 2014 (16:58 IST)

शारापोवा म्हणते, सचिन तेंडुलकर कोण आहे ?

टेनिस क्वीन अशी ओळख असलेली रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा जगभरात प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून अनभिज्ञ आहे. सचिन तेंडुलकर कोण, हे मला माहिती नाही, असे वक्तव्य शारापोवाने केले आहे.

लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेला सचिनने शनिवारी हजेरी लावली होती. त्यावेळी रॉयल बॉक्समध्ये सचिनबरोबर इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, गोल्फपटू अयान पॉल्टर उपस्थित होते. याविषयी शारापोवाला विचारले असता ती म्हणाली, की रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना मी ओळखत नाही. बेकहॅमशी माझी ओळख आहे, पण तेंडुलकर कोण मला माहित नाही.

बेकहॅमविषयी भरभरून बोलताना शारापोवा म्हणाली, की बेकहॅमला मी अनेकवेळा लॉस एन्जल्स व लंडनमध्ये भेटले आहे. तो एक उत्कृष्ट फुटबॉलपटूसह चांगला माणूस आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक टप्पे पार केले आहेत.

त्याच्याशी बोलून मला कायम समाधान वाटते. तो माझा चांगला मित्र नसला तरी, आम्ही आमच्या कारकिर्दिविषयी एकमेकांशी बोलत असतो.