शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

शारापोव्हा, बर्डिचची आगेकूच

WD
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत सर्बियाची अँना इव्हानोव्हिक व पोलंडची अँग्निस्का रंदावन्स्का यांना तिसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरे मानांकन प्राप्त रशियाची मारिया शारापोव्हा, डोमनिका सिबुलकोव्हा, सारा इराणी, रशियाची स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांवर मात करीत आगेकूच कायम राखली. पुरुष विभागात सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डिचने केव्हिन अँन्डरसनची झुंज ६-४, ३-६, ६-७ (४/७), ६-४, ६-४ ने मोडून काढत चौथी फेरी गाठली. २0व्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सने मार्क जाहिरीचा संघर्षपूर्ण लढतीत ७-६(७/१), ३-६, ६-१, ३-६, ७-५ ने पराभव केला.

१५ व्या मानांकित स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोव्हाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना स्पेनच्या बिगरमानांकित मारिया जोस मार्टिनेझ सांचेझचा ६-२, ६-१ ने सहज पराभव केला.