शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :ब्रासिलिया , सोमवार, 16 जून 2014 (11:57 IST)

शेवटच्या मिनिटातील सेफेरोव्हिकच्या गोलमुळे स्वित्झर्लंडचा इक्वेडोरवर विजय

ब्राझीलमध्ये खेळल जात असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्वित्झर्लडने शेवटच्या क्षणी गोल करून इ गटातील साखळी सामन्यात इक्वेडोरचा 2-1 ने पराभव केला.

पूर्वार्धामध्ये दोन्ही संघामध्ये 20 मिनिटांपर्यंत अटीतटीचा खेळ चालू होता. 22 व्या मिनिटास इनेर व्हॅलेनसिाने इक्वेडोरचा पहिला गोल केला. त्यानंतर  विश्रंतीर्पत इक्वेडोरच्या खेळाडूंनी जोरदार बचाव केला आणि आपली आघाडी 1-0 अशी कायम ठेवली.

उत्तरार्धामध्ये मात्र लगेचच तिसर्‍या म्हणजे 48 व्या मिनिटास अँडमी मेहमेदी याने गोल करून स्वित्झर्लडला बरोबरी साधून दिली. या दोघांनी फिल्ड गोल केले. नव्वद मिनिटाचा नियोजित खेळ संपताना दोन्ही संघाची 1-1 अशी बरोबरी होती. त्यानंतर 3 मिनिटे स्टॉपेज टाइम म्हणजे दुखापतीची वेळ देण्यात  आली. या वेळेतील शेवटच्या मिनिटास सेफेरोव्हिकने महत्त्वपूर्ण असा विजयी गोल केला आणि स्वित्झर्लडला विजय मिळवून दिला.

सुरुवातीपासून 48 मिनिटापर्यंत इक्वेडोरचीच आघाडी होती. दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. दोन्ही संघाने दांडगाईचा खेळ केला. त्याचप्रमाणे दोन्ही संघाच्या गोलरक्षकांना कठोर चाचणी द्यावी लागली. स्वित्झर्लडला 70 व्या मिनिटास गोल करण्याची संधी होती; परंतु ती त्यांनी वाया घालविली. त्यांना 25 मीटरच्या अंतरावर फ्री कीक मिळाली होती. परंतु त्याचा लाभ ते उठवू शकले नाही. त्यानंतर त्यांनी तंनी गोल केला होता परंतु तो ऑफसाइड ठरला. या दोन्ही संघामध्ये हा पहिलाच सामना होता. स्वित्झर्लडचे मानांकन हे 6 क्रमकाचे होते तर इक्वेडोरचे मानांकन 26 व्या स्थानावरील होते.