गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:06 IST)

साक्षीचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत

दिल्ली विमानतळावर पहाटे 4च्या सुमारास साक्षी मलिकचे आगमन होताच ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. साक्षीचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
रिओ ऑलिम्पिकमधील 58 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने किर्गिस्तानच्या एसुलू ताइनीबेकोवा हिला 8-5 गुणांनी चीतपट करून कांस्यपदकाची कमाई केली होती. साक्षीने आपल्या कारकीर्दीतील हे तिसरे पदक जिंकले आहे. साक्षी मलिक कांस्य पदक घेऊन मायदेशी परतली. पहाटे 4च्या सुमारास दिल्ली विमानतळावर तिचे आगमन होताच  मोठा जल्लोष करण्यात आला.
 
साक्षीच्या गौरवासाठी केंद्र सराकारच्या वतीने तिला खेलरत्न आणि हरियाणा राज्य सरकारमार्फत अडीच कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.