शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: वुहान (चीन) , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (12:09 IST)

सानिया-मार्टिनाला वुहान ओपनचे जेतेपद

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिसची जोडीने आपली घौडदोड कायम ठेवली आहे. या सुपरफास्ट जोडी वर्षातील सातव्या जेतेपदावर नाव कोरले आहे. सानिया आणि मार्टिना या अव्वल मानांकित जोडीने वुहान ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 
 
इंडो-स्विस जोडीने रोमानियाच्या इरिना केमिला बेगू आणि मोनिका निकेल्कू यांना अंतिम सामन्यात हरविले. सानिया-मार्टिना जोडीने कॅमेलिया-निकूलेस्कूला डोकेवर काढण्याची संधी न देता संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. सानिया-मार्टिना जोडीने दोन्ही सेट ६-२, ६-३ असे जिंकले. या जोडीचा हा सातवा विजय आहे. या जोडीने नुकतेच क्वांगचो टायटल जिंकले होते. यावर्षी या जोडीने विम्बल्डन आणि अमेरिकी ओपनसह सात टायटल जिंकले आहेत. 
 
सानिया आणि मार्टिना या जोडीने सेमीफायनलमध्ये चीनी ताइपे येथील चिंग चान आणि युंग जान चान या जोडीला हरविले. त्यांनी या दोघींना ५३ मिनिटांत ६-२ आणि ६-१ ने हरविले. सानिया आणि मार्टिनने ८८ पैकी ५३ पॉईंट आपल्या नावावर केले. तसेच १० पैकी ५ ब्रेक पॉर्इंटही केले. 
 
यापूर्वी सानिया आणि मार्टिना या जोडीने क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकी राक्वेल जोंस आणि अबीगेल स्पीयर्स या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला हरविले. त्यांना ५८ मिनिटांत ६-२ आणि ६-२ या पॉर्इंटने पराभव केला. दुस-या टप्प्यात सानिया आणि मार्टिना यांनी पोलंडची क्लाउडिया जँस इग्नाचिक आणि ऑस्टड्र्ढेलियाची अनास्तासिया रोडियोनोवा या जोडीला ६-३ आणि ६-२ या पॉर्इंटने हरविले.