शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 11 जुलै 2012 (10:46 IST)

सानियाची आई मॅनेजर बनून जाणार ऑलिम्पिकमध्ये

अखिल भारतीय टेनिस महासंघ सानिया मिर्झास खूश करण्यासाठी तिच्या आईला अलिम्पिकमध्ये महिला संघाची मॅनेजर म्हणून लंडनला पाठवणार आहे.

FILE
ऑलिम्पिक संघ निवडीच्या मुद्यावर वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या महासंघाने नसीमा यांना मॅनेजर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेऊन आणखी एक वाद निर्माण केला आहे. सपोर्ट स्टाफ मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून खेळाविषयी विशेष ज्ञान नसलेल्या त्या एकमेव सदस्या आहेत. सपोर्ट स्टाफची निवड दोन दिवसांअगोदरच झाली होती, मात्र वाद टाळण्यासाठी मौन पाळण्यात आले होते.

डेव्हिस करंडकातील नॉन प्लेयिंग कर्णधार एसपी मिश्रा, लिएंडर पेसचे ट्रेनर संजय सिंह, महेश भूपति आणि रोहन बोपन्नाचे ट्रेनिंग कंसलटंट श्यामल वल्लभजी व सोमदव बर्मनचे फिजियोथेरपिस्ट मिलोस गॅलेसिस यांचा सपोर्ट स्टाफ मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघास पाठवलेल्या यादीत नसीमा आणि मिश्रा यांना अधिकारी दाखवण्यात आले आहे. हे दोघे सोमदेव बर्मनच्या ट्रेनरसोबत लंडनमध्ये ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहिल. तर पुरूष एकेरीचा सपोर्ट स्टाफ व्हिलेजच्या बाहेर राहिल.