गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्यूयॉर्क , मंगळवार, 13 सप्टेंबर 2011 (11:24 IST)

सामंथा स्टोसूरला पहिल्या ग्रँडस्लॅम!

PTI
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या रोमहर्षक फायनलमध्ये तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या सेरेना विल्यम्सला ६-२, ६-३ असे पराभूत करीत ऑस्ट्रेलियन टेनिसपटू सामंथा स्टोसूरने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या यशाबरोबरच स्टोसूर १९७३ मध्ये मार्गेरेट कोर्टनंतर न्यूयॉर्कमध्ये विजेतेपद पटकावणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू बनली आहे.

सेरेना दुसर्‍या सेटमध्ये चेअर अंपावर संतापली होती; परंतु स्टोसूरने संयम राखताना या १३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियनवर वर्चस्व राखताना तिचा सरळ सेटस्मध्ये पराभव करताना सहज विजय मिळवला. विशेष म्हणजे फायनलपर्यंतच्या प्रवासात सेरेनाने एकही सेट गमावला नव्हता.