शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना नेहवालने तिसरे स्थान राखले!

WD
भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवालने बँडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत महिला एकेरीतील आपले तिसरे स्थान राखण्यात यश मिळविले. शुक्रवारी जागतिक बॅ‍डमिंटन संघटनाची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली.

सायनाने गत ऑक्टोबर महिन्यात डेन्मार्क ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर फ्रेंच ओपन सुपर सीरिजमध्ये तिला जपानच्या मिनात्सू मितानीने अंतिम फेरीत पराभूत केले होते. दरम्यान, भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील 25वे स्थान कायम राखले. पुरुषांच्या क्रमवारीत लंडन ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पारुपल्ली कश्यक आणि मुंबईच्या अजय जयरामनेही अनुक्रमे 23वे आणि 27वे स्थान राखले. सौरभ वर्माला मात्र एका स्थानाचा फटका बसल्याने तो 33व्या स्थानी घसरला. के.टी. रूपेश आणि सनावे थॉमसच्या जोडीने एका स्थानाच्या प्रगतीसह 27वे स्थान पटकावले. महिला दुहेरीच्या क्रमवारीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाची भारतीय जोडी 21व्या स्थानावर असून, मिश्र दुहेरीत ज्वाला आणि व्ही. दिजूची जोडी 19व्या स्थानावर आहे.