शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना, ली चोंग मालामाल

WD
आयबीएल अ‍ॅक्शन सेलमध्ये भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला घसघशीत बोली मिळाली. तर नंबर वन ली चोंगवी ला सर्वाधिक मोठी रक्कम मिळाली. सायनाला हैदराबाद हॉटशॉटस् ने १ लाख २० हजार डॉलर्सला खरेदी केले तर मुंबई मास्टर्सने ली चोंग वेई साठी १ लाख ३५ हजार डॉलर्स मोजले. आबीएल साठी हा लिलाव सोमवारी सुरू झाला.

सायना त्या सहा आयकॉन खेळाडूंपैकी एक आहे ज्यांची बेस प्राईज ५० हजार डॉलर्स (२९ लाख ७० हजार ४८२ रु.) हैदराबाद हॉटशॉटस्ने सायनासाठी ७१ लाख २७ हजार ९८२ रु. मोजले. मलेशियन आयकॉन ली चोंग वेईला खरेदी करण्यासाठी मुंबई मास्टर्स आणि दिल्ली स्मॅशर्समध्ये जोरदार झटापट झाली.

अखेर मुंबई मास्टर्सने बाजी मारली. मुंबई मास्टर्सची मालकी क्रिकेट लिजेंड सुनील गावस्करकडे आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळविणा-या पी.कश्यपला बंगा बिटस्ने ७५ हजार डॉलर्सला (४४ लाख ५५ हजार ६२२ रु.) खरेदी केले. उदयोन्मुख बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला लखनऊ वॉरियर्सने ८० हजार डॉलर्सला (सुमारे ४७ लाख ५० हजार रु.)खरेदी केले आहे.दुसरी रंजक झटापट दिल्ली आणि पुणे पिस्टनमध्ये झाली. त्यांनी व्हीएतनामच्या तीन्ह मिन्ह न्यू गेन वर ४४ हजार डॉलर्स खर्च केले. त्याची बेसप्राइज २५ हजार डॉलर्स होती. पीव्हीपी ग्रुप (हैदराबाद), बीओपी ग्रुप (बंगलोर), क्रिश ग्रुप (दिल्ली), सहारा (लखनऊ), बर्मन फॅमिली (पुणे) आणि मुंबई मास्टर्सच्या मालकांनी ६६ खेळाडूंवर सुमारे दोन लाख ७५ हजार डॉलर्स खर्च केले.स्पर्धेत सहा फ्राचांयझी असून प्रत्येक संघात ११ खेळाडू राहतील. त्यापैकी सहा भारतीय, ४ विदेशी आणि एक भारतीय ज्युनियर बॅडमिंटनपटू राहील. महिला विभागातील दुहेरी विशेषज्ञ ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांना कमी किंमत मिळाली. त्यांना त्यांच्यासाठी ५० हजार डॉलर्स बेसप्राइज होती. ज्वालाला दिल्लीने ३१ हजार डॉलर्स तर अश्विनीला पुण्याने २५ हजार डॉलर्स दिले. या दोन्ही खेळाडूंना बेसप्राइज पेक्षा कमी रक्कम मिळाल्याने आयबीएल त्यांना भरपाई दाखल रक्कम देणार आहे. ज्वालाला १९ हजार डॉलर्स तर अश्विनीला २५ हजार डॉलर्स मिळतील.