शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 17 नोव्हेंबर 2011 (12:41 IST)

सायना हाँगकाँग ओपनच्या दुसर्‍या फेरीत

ND
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने हाँगकाँग सुपर सीरिजमध्ये दुसर्‍या फेरीत प्रवेश करताना स्थानिक खेळाडू त्सेका च्यानचा फडशा पाडला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायनाने केवळ 28 मिनिटात च्यानचा धुव्वा उडवला.

सायनाने हा सामना 21-4, 21-17 असा एकतर्फी जिंकला. दुसर्‍या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सोळात प्रवेश करणार्‍या भारताच्या अजन जयरामने शानदार कामगिरी करत क्रमवारीत 6व्या स्थानावर असलेल्या शो ससाकी याचा परावभ केला. जयरामने हा सामना 14-21, 21-1 8, 21-14 असा जिंकला. त्याने हा सामना 49 मिनिटात जिंकला.