शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायनाचा रिती स्पोर्टशी 40 कोटींचा करार

PR
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी भारताची फुलराणी सायना नेहवालवर आता धनवर्षावास सुरुवात झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायनाने रिती स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीबरोबर तीन वर्षांसाठी 40 कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. रिती स्पोर्ट सायनाचे ब्रॅण्ड प्रमोशन, इमेज बिल्डिंग, कॉर्पोरेट प्रोफाईल आणि जाहिरातीचे काम पाहणार असल्याचे कंपनी प्रमुख अरुण पांडे यांनी सांगितले.

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यापासून सायनाच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे. तिच्यासमोर जाहिरातदारांची रांग लागली आहे. सध्या ती नऊपेक्षा जास्त मल्टिनॅशनल कंपनीच्या जाहिरातींमध्ये दिसून येते.