गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ऑडेन्स , शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (13:44 IST)

सायनाला पराभवाचा धक्का

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालला डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्‍याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी सायनाने कोरिया स्पर्धेतून माघार घेतली होती. 2012मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सायना जेतेपदाची दावेवार होती. मात्र जपानच्या मिनात्सू मितानीने सायनावर 21-18, 21-13 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये 10-10 अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर मितानीने सातत्याने गुण मिळवत पहिला गेम नावावर केला.