गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 19 सप्टेंबर 2011 (11:14 IST)

सुशीलकुमारचा पराभव!

जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार मॉस्को येथील इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ६६ किलो वजन गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात दुसर्‍या फेरीत युक्रेनच्या आद्रेय स्टैडनिककडून पराभूत झाला.

जागतिक कुस्ती स्पर्धेत सुशीलकुमारचा पराभव झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. या स्पर्धेत सुशीलकुमारसह मौसम खत्री याने भारताच्या आशा जागवल्या होत्या, त्याने ९६ किलो फ्रीस्टाईलमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तेथे तो स्लोवाकियाच्या जोजेफ जालोवियारकडून पराभूत झाला. त्याने ब्रिटनच्या लियोन ग्रेगरी रैटिंगन आणि आर्मेनियाच्या हारुतयुन येनोकॅयानला पराभूत केले होते.