शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. शीख
  4. »
  5. दहा गुरु
Written By वेबदुनिया|

गुरू हरगोविंद सिंग

गुरू हर गोविंदसिंग यांचा जन्म अमृतसर जिल्ह्यात जून १५९५ मध्ये झाला. गुरू अर्जुनसिंह व माता गंगाजी यांचे ते पुत्र होते. वयाच्या अकराव्या वर्षी गुरू अर्जनसिंग यांच्याकडून त्यांनी गादीची सूत्रे स्वीकारली.

गुरू हर गोविंदसिंग यांनी शीख धर्मियांना लष्करी प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी स्वतः शस्त्रास्त्रे चालविणे, घोडदौड व कुस्तीचे शिक्षण घेतले. सतलज नदी पार करून किरतारपूर गाठले व तेथे त्यांनी शीख धर्माचे केंद्र स्थापन केले. तेथे त्यांनी दहा वर्षे घालविली.

फेब्रूवारी १६४४ मध्ये ते अनंताच्या प्रवासास निघून गेले. त्यांनी हर राय साहेब यांची आपला उत्तराधिकारी नेमले. गुरू हर राय साहेब हे सातवे गुरू होय.