शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

11 महिन्यांमध्ये 1100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भामधील सहा जिल्ह्यांमध्ये दर आठ तासाला एका शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या वर्षी 11 महिन्यांमध्ये 1057 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळल्याचं दिसून आलं आहे. 2001 पासून 15 डिसेंबरपासून 16 हजार 918 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे.  
 
2019 वर्षभरात जानेवारी महिन्यात 85, फेब्रुवारी 78, मार्च 92, एप्रिल 78, मे 98, जून 95, जुलै 105, ऑगस्ट 114, सप्टेंबर 106, ऑक्टोबर 86, नोव्हेंबर 95 आणि 15 डिसेंबरपर्यंत 35 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
 
राज्यात सर्वांत जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. या जिलह्यातील 260 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 258, अमरावती जिल्ह्यात 257, अकोला 115, वाशीम 91, वर्धा जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
 
शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर यावा यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण त्यातल्या बऱ्याच अटींच्या पूर्तता न करता आल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.