शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 6 मार्च 2022 (13:37 IST)

अभिनेत्रीं सोनाक्षीच्या विरोधात वारंट जारी, 25 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

फसवणूक प्रकरणी सोनाक्षी सिन्हाविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी त्यांना 25 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अलीकडेच तिचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती सलमान खानसोबत होती. फोटो पाहून असे वाटत होते की ती सलमान खानसोबत लग्न करत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोनाक्षीनेही यावर जोरदार उत्तर दिले. आता सोनाक्षी पुन्हा चर्चेत आली असून या वेळी तिच्यावर फसवणूक केल्याचे आरोप आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील न्यायालयाने सोनाक्षीच्या विरोधात अजामीनपात्र वारंट काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाण्याच्या भागात  राहणारे प्रमोद शर्मा यांनी 2018 साली एका कार्यक्रमाचे आयोजन केले असता त्या कार्यक्रमाला सोनाक्षीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. या कार्यक्रमासाठी तिने मागितलेले पैसे देखील आयोजकांनी तिला दिले. पण ती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलीच नाही. या वर आयोजकांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता अभिनेत्रीच्या मॅनेजर ने  पैसे परत देण्यास नकार दिले.

अनेक वेळा आयोजकांनी सोनाक्षी सिन्हा यांच्याशी संपर्क साधून देखील पैसे न मिळाल्यावर तिच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.प्रमोद शर्मा यांनी अभिनेत्री सोनाक्षी सह 5 जणांवर 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सोनाक्षी सतत गैरहजर असल्यामुळे आता न्यायालयाने सोनाक्षीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने पोलिसांना अटक करून 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.