गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

नृत्य करीयरः एक संधी

- अनुया जोशी

ND
आजचा युवक बुद्धिमान हुशार, कष्टाळू तसेच कल्पक वृत्तीचा आहे. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास तो आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो यात शंकाच नाही. सायबर संस्कृतीतून घडत असलेल्या या नव्या पिढीकडे विविध क्षेत्रातील आव्हानांना यशस्वीपणे पेलण्याचे सामर्थ्यही आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय युवकाने हे तर सिद्धच केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्यातील छंद विविध गुण कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नवीन वाट मिळावी या साठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लिखाण असे विविध छंदाचे प्रकार आहेत. परंतु, या छंदाकडे केवळ एक आवड म्हणून न जोपासता आपण त्यांना एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडू शकतो आणि अशाच क्षेत्रापैकी नृत्य जाणकार युवकांना नृत्य व्यवसायामध्येही संधी सापडतील. जिद्द भरपूर मेहनत करण्याची क्षमता व इच्छा यासाठी हवी. या नृत्य व्यवसाय संधीची ओळख करून देणारा हा लेख.

  परिपूर्ण संगीत म्हणजे गीत वादन व नृत्याचा संगम होय. विविध प्रकारचे पदण्यास, हस्तमुद्रा, नेत्र, अंगविक्षेप आणि अभिनय याद्वारे नृत्यात विविध रसभाव यांची अभिव्यक्ती करायची असते.      
पार्श्वभूमी
देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे. आजचा युवक हा नव्याने शोध घेण्याकडे आकर्षित होत आहे. सतत काहीतरी नवीन करण्याकडे त्याचा ओढा आहे हे प्रकर्षाने जाणवते. परंतु, त्यांच्या पालकांना मात्र पारंपरिक उद्योगातूनच मुलाने पदार्पण करावे असे वाटत आले आहे. एखादा चाकोरीबाहेरील व्यवसाय त्याने निवडला तर तो यशस्वी होणार नाही असे त्यांना वाटते. पेन्शन विविध सवलती, इंन्क्रीमेंट, प्रमोशन अशा भवितव्याचा विचार आजची पिढी करत नाही असे पालकांना वाटते. त्यामुळे गायन, वादन, नृत्य, खेळ अशा क्षेत्रांकडे वयोवृद्ध मंडळीतील अनेक पालक अत्यंत नाराजीने पाहत असतात.

नृत्यात करियर करू इच्छिणार्‍याने म्हणूनच याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
''रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।''

अर्थात रसभाव व व्यंजनाचा मिलाप म्हणजेच नृत्य होय. तसेच ''गितम नृत्यम वाद्यम मयं संगीतम उच्चतो'' परिपूर्ण संगीत म्हणजे गीत वादन व नृत्याचा संगम होय. विविध प्रकारचे पदण्यास, हस्तमुद्रा, नेत्र, अंगविक्षेप आणि अभिनय याद्वारे नृत्यात विविध रसभाव यांची अभिव्यक्ती करायची असते. व्यक्त केल्या जाणार्‍या भावनांना रस म्हटले आहे. अभिजात संगीत मध्ये रसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. शृंगार, वीर, करूण, हास्य, अद्भूत, बीभत्स, रौद्र, भयानक, शांत असे रसाचे एकूण नऊ प्रकार वर्णिले आहेत. नृत्यांचे विविध प्रकार आपण पाहतो. ज्यात महाराष्ट्राची लावणी, पंजाबचा भांगडा, गुजराथचा गरबा, राजस्थानचे राजस्थानी नृत्य हे प्रकार मुख्यत: लक्षात राहतात. या शिवाय कोळी नृत्य, रास नृत्य, यक्षगान, लेझीम नृत्य, पाश्चात्य नृत्य, बॅले इत्यादी नृत्याचे प्रकार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यकला. भारतीय संस्कृतीत शास्त्रीय नृत्याचे एकूण सात प्रकार वर्णिले आहेत ज्यात
1. भरतनाट्यम - तमिळनाडू
2. कथकली - केरळ
3. कथ्थक - मणिपूर
4. कुचीपुडी - आंध्र प्रदेश
5. ओडीसी - ओरीसा
7. मोहिनीअट्टम - केरळ

(क्रमशः)