शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

अ‍ॅनिमेशन: भविष्यातील रूपेरी कर‍िअर

NDND
हल्ली चित्रपटांमध्ये अ‍ॅनिमेशनचा वापर वाढला आहे. शिवाय स्वतंत्र अ‍ॅनिमेशनपटही भरपूर येत आहेत. सांवरिया, क्रिश, माय फ्रेंड गणेशा, हम तुम, राजू चाचा, अभय, जजंतरम्-ममंतरम्, हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, ज्युरासिक पार्क अशा अनेक चित्रपटांमध्ये अ‍ॅनिमेशनचा मोठा हात आहे. छोट्या पडद्यावरही अनेक जाहिरातींत अ‍ॅनिमेशनचा मोठा वापर केला जातो. गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि वेब मीडीयात आलेल्या बूममुळे 3 डी आणि 2 डी अ‍ॅनिमेशनने बाजारात आपले स्थान निर्माण केले.

या सगळ्यांमुळे अ‍ॅनिमेशन सृजनात्मकतेसाठी आणि चांगली कमाई करून देणाऱ्या करियरसाठी प्रसिद्ध झाले. म्हणूनच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधींची दारे उघडली. येत्या तीन ते चार वर्षात या क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुमारे 60 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचे एका सर्वेक्षणात सांगितले आहे.

अ‍ॅनिमेशनचा विस्तार जाहिरात, सिनेमा आणि खेळापर्यंतच मर्या‍दित आहे. परंतु, इतर काही क्षेत्रांपेक्षा या क्षेत्रात लवकर रोजगार मिळतो. भारतात अ‍ॅनिमेशनचा प्रसार झपाट्याने होत आहे. कारण, अमेरिकेत एक अ‍ॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यासाठी 100 ते 175 दशलक्ष डॉलर एवढा खर्च येतो. भारतात असाच‍ चित्रपट तयार करण्यासाठी केवळ 15 ते 25 दशलक्ष डॉलर एवढा खर्च येतो.

भारतात सध्या सुमारे 10,000 अ‍ॅनिमेटर आहेत. परंतु, सध्या 50,000 अ‍ॅनिमेटरची मागणी आहे. म्हणून या क्षेत्रात वाढत्या मागणीबरोबर रोजगाराच्या अधिक संधी मिळतील. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी केवळ सृजनात्मक विचाराची आवश्यकता आहे. यासाठी अमूमन फाइन आर्ट आणि कॉम्प्यूटरचे ज्ञान असलेल्या लोकांना या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे.

अ‍ॅनिमेशनमध्ये स्‍टोरी बोर्ड, कॅरेक्‍टर डिझाइनिंग, मूव्हमेंट, माउल्‍डिंग, शेड, थ्री-डी, कलर, पार्श्वसंगीत अशा विविध भागात काम केले जावू शकते. या सर्वांना एकमेकांबरोबर जोडण्यासाठी प्लानर आणि एडिटरची आवश्यकता असते. आपली कल्पनाशक्ती सशक्त असेल तर आपल्याला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत.

एनिमेशनसाठी एनिमो, माया, 3 डी स्‍टूडियो मॅक्‍स, एडोब आफ्टर इफेक्‍ट, टिकटॅकटून, फ्लॅश गिफ्ट एनिमेटर, यूलीडबरोबर एडोब फोटो शॉप, इल्‍यूस्‍ट्रेटर, कोरल ड्रॉ यामध्ये अनेक कंपन्या काम करतात. अ‍ॅनिमेटर म्हणून काम करताना सुरवातीला आठ ते दहा हजारापर्यंत पगार मिळतो. परंतु, काही वर्षात या पगारात वाढ होऊन तो 40 ते 60 हजारापर्यंत जातो.

प्रशिक्षणासाठी संस्था --
* एप्‍टेक विद्यापीठाअंतर्गत अरिना मल्‍टीमीडिया
* माया इंन्स्‍टीट्यूटच्याअंतर्गत माक अकादमी
* बिरला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्‍नालॉजी, जयपूर
* फिल्‍म अँड टेलिव्हीजन इन्स्‍टीट्यूट ऑफ इंडिया, पुणे
* सी-डॅक मल्‍टी लोकेशन, ए-34 इंडस्‍ट्रियल एरिया, फेस-8, एसएएस नगर, मोहाली
* सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ इमेजिंग टेक्‍नालॉजी, चित्रांजली स्‍टूडिओ, तिरुवेल्‍लम, तिरुअनंतपुरम
* हिट एनिमेशन अकादमी, 7 ए. रोड, 12 बंजारा हिल्‍स, हैद्राबाद आणि मुंबई
* आयआयटी गुवाहाटी, मुंबई
* नॅशनल स्‍कूल ऑफ डिझाइन सेंटर, पलाडी, अहमदाबाद