रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

परदेशी भाषांमध्‍ये करीअरच्‍या उज्ज्वल संधी

NDND
ग्लोबलायझेशनमुळे देशा-देशातील अंतर कमी झाले आहे. विविध देशांमध्ये व्यापार- व्यवसायामुळे मै‍त्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे विदेशी भाषा अवगत असणे आज गरजेचे होऊन बसले आहे. विदेशी भाषेत उत्तम भविष्य घडविण्याची भारतीय विद्यार्थ्यांना उज्ज्वल संधी चालून आली आहे. चाकोरीतील साचेबंद शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना विदेशी भाषेचे शिक्षण आकर्षित करीत आहे. त्यामुळे विद्यार्थी विदेशी भाषेत विशेष करून फ्रेंच, जर्मन व रशियन भाषेत करियर करण्‍याकडे अधिक भर देताना दिसत आहेत.

भारतीय उत्पादनाला विदेशी बाजार पेठेत‍ दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्याप्रमाणात भारत व्यापार विस्तार करत आहे. तसेच भारतातही विदेशी वस्तू मोठी मागणी आहे. या कारणामुळे विदेशी भाषेचे ज्ञान असणार्‍या होतकरू तरुणांची विदेशी कंपन्यांना गरज भासत असते.

अलिकडच्या काळात 'फ्रेंच भाषा'ही अधिक लोकप्रिय झाली आहे. इंग्रजी भाषेच्‍या जाणकारांना फ्रेंच भाषा शिकणे काहीच कठीण नाही. कारण इंग्रजी व फ्रेंज भाषा काही प्रमाणात मिळती जुळती आहे. इंग्रजी भाषेनंतर फ्रेंच भाषेचा क्रमांक लागतो.
  विदेशी भाषा अवगत असणा-यांना अनुवादक, समुपदेशक, पुस्तक प्रकाशक, टूरिस्ट गाइड, प्राध्यापक याशिवाय उत्पादन संस्था, एअरलाइन्स, विदेशी बॅंका आदी ठिकाणी चांगल्या पगारीची नोकरी सहज मिळवता येते.      


जर्मन भाषेलाही फार महत्त्व प्राप्त झाले आहे. जर्मनी, ऑस्ट्रेलिया व स्वित्झरलॅंड येथील नागरिकांची जर्मन ही बोली भाषा आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अलिकडच्या काळात मोठ्या संख्येने भारतीय जर्मन भाषेचे अभ्यास करत आहे.

जपान टेक्नॉलॉजीच्या उत्पादनाना जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. त्‍यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना जपानी भाषा तज्ज्ञांची आवश्यकता असते. जपानी भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते.

भारत व रशिया यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला असून रशियन भाषा ही भारतीयाना आकर्षित करणारी महत्‍वाची भाषा ठरत आहे. चायना वस्तुंना मोठी बाजारपेठ प्राप्त झाली असल्याने चीनी भाषेत करियर करण्याची उज्वल संधी भारतीय विद्यार्थ्यांना आहे.

विदेशी भाषा अवगत असणा-यांना अनुवादक, समुपदेशक, पुस्तक प्रकाशक, टूरिस्ट गाइड, प्राध्यापक याशिवाय उत्पादन संस्था, एअरलाइन्स, विदेशी बॅंका आदी ठिकाणी चांगल्या पगारीची नोकरी सहज मिळवता येते. पंचतारांकित हॉटेल, पर्यटन मंत्रालय, मनोरंजन, वाणिज्य, व्यापार संबंधित विविध क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होत असते.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा व पदवी अशा तीन प्रकारात परदेशी भाषेचे शिक्षण घेता येते. प्रमाणपत्र व पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी 10+2 परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विदेशी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्या भाषेची प्राथमिक माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भाषेचे प्राथमिक माहिती नसलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गोची होत असते.

प्रशिक्षणासाठी संस्था-
1. दिल्ली विद्यापीठ, दिल्ली.
येथे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, अरबी, इटालियन, चीनी, तिबेटी, सुहाली, पारसी, पोलिश, बुल्गारियन आदी विदेशी भाषांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली.
येथे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, अरबी, जपानी, चीनी, मंगोलियन, रशियन, सिंहली, पोर्तुगीज आदी विदेशी भाषांचा अभ्यासक्रम शिकविले जातात.

3. राजस्थान विद्यापीठ, जयपूर.
येथे जर्मन, फ्रेंच रशियन आदी‍ भाषांचे कोर्स उपलब्ध आहेत.

4. मुंबई विद्यापीठ, मुंबई.
येथे चीनी व जपानी भाषेचे पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.

5. विश्व भारती, शांती निकेतन, कोलकाता.
येथे चीनी व जपानी भाषेचे प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्स शिकविले जातात.

6. पुणे विद्यापीठ, पुणे.
येथे जपानी भाषेचा अभ्यासक्रम शिकविला जातो.