रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

पेट्रोलियम इंजिनियरींग

अशोक जोशी

WDWD
पेट्रोलियम इंजिनियरींग या क्षेत्रात करियर करण्यासाठी खालील पात्रता हवी.

भूगर्भशास्त्र (जिओलॉजी) विषयात पदवी किंवा पदवीधर.
जिओफिजिक्स: एक्सफ्लेरेशन जिओफिजिक्स विषयासाठी पाच वर्षाचा इंटीग्रेटेड अभ्यासक्रम असून त्यामध्ये एम. टेक. ही पदवी देखील केली जाते.
पेट्रोलियम इंजिनियरींगमध्ये बी. ई. किंवा बी. टेक पदवी.

हेही चालू शकतील.
* प्रॉडक्शन किंवा इंडस्ट्रीयल इंजिनियरींग: बी.ई.
* सिव्हिल इंजिनियरींग: बी.ई./बी.टेक किंवा एम.ई./एम.टेक
* मेकॅनिकल इंजिनियरींग: बी.ई. किंवा एम.ई.
* इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियरींग: इंस्ट्रुमेंटेशन विषयात बी.ई. किंवा बी.टेक
* केमिकल इंजिनियरींग: केमिकल इंजिनियरींग विषयात बी.ई. किंवा एम.ई.
* इलेक्ट्रिकल इंजिनियरींग: इलेक्ट्रिकल इंजिनियरींग विषयात बी.ई.
एम. ई. पर्यंत कोणीही कंट्रोल आणि इंस्ट्रुमेंटेशन विषयात विशेष अभ्यास करू शकतो.

भारतात सध्या ज्या क्षेत्राचा अति जलदगतीने विकास होत आहे, त्यामध्ये पेट्रोलियम आणि ऊर्जा हे एक क्षेत्र आहे. देशात अशा प्रकारचे शिक्षण देणार्‍या संस्थांना विशेष मागणी असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सरकार तेलाच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळे आपल्याला करियर करण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.

''इंधन आणि उर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करणे म्हणजे, शिक्षणानंतर करिअरमध्ये सोने लुटणे होय.''

करीयरची सुवर्णसंध
जीवनात दिवसेंदिवस पेट्रोलियम आणि उर्जा आवश्यक झाली आहे. त्याशिवाय आपले दैनंदिन जीवन शक्य नाही. आपल्या वाहनांत इंधनाच्या रूपात उद्योगधंदे किंवा घर चालविण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. अशा प्रकारच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांना ही एक सुवर्णसंधी आहे. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी गुंतवणूक केल्यामुळे अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतातील पेट्रोलियम उद्यो
भारतात खनिज तेल व नैसर्गिक गॅस आयोग (ओएनजीसी) एक मोठी कंपनी आहे. तेल उद्योगाचे अपस्ट्रीम (अन्वेषण आणि उत्पादन कार्यकलाप) किंवा डाउनस्ट्रीम (रिफाइनिंग मार्केटिंग व वितरण) या क्षेत्रात वर्गीकरण केले जाते. या सर्व स्तरावर करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे.