शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

आयुष मंत्रालयाचा सल्ला : हर्बल टी तुम्ही ट्राय केलात का

कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेसह आरोग्याशी निगडीत काळजी घेणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी पोशक तत्व असलेल्या आहाराचं सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. असाच एक सल्ला आयुष मंत्राल्याकडून देण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ‘हर्बल टी’च्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हर्बल टी तयार करताना कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याच्या सूचना देखील मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला निरोगी ठेवणारी हर्बल टी बनवतात तरी कशी याची माहिती आपण घेऊ.
  • तुळशीची पानं
  • दालचिनी 
  • काळी मिरी 
  • सुंठ 
  • मनुके 
  • गूळ
  • लिंबू 
जसा नेहमीचा चहा तयार करता तशीच पद्धत हर्बल टीसाठी देखील वापरा. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात वर नमूद केलेल्या जिन्नसांचा समावेश करा. तसंच तुमच्या आवडीनुसार गुळाचा आणि लिंबू रसाचा वापर करा. मंद आचेवर चहा उकळल्यावर घरातील सदस्यांना हा औषधी चहाचा आस्वाद नक्की घ्यायला सांगा. तर दिवसातून हर्बल टीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तर याचा अतिरेक करू नये, असा सल्ला ही तज्ज्ञ देतात.