शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (07:45 IST)

राज्यात ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून बुधवारी ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ६ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात  ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.४० टक्के इतका आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ७९ हजार १८५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० लोक हे होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ७०१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहे. सध्या एकूण ८२ हजार ३४३ कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत.