शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (07:21 IST)

एसबीआयकडून तातडीचे कर्ज योजना

एसबीआयने खास कर्ज सुविधे अंतर्गत केवळ ४५ मिनिटात पाच लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. बँकने याला तातडीचे कर्ज योजना म्हणून नाव दिले आहे. केवळ घरी बसून हे कर्ज घेता येते. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट  onlinesbi.com आणि sbi.co.in यावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच YONO अॅपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करु शकता. या कर्जावर बँकेने व्याज दरही कमी ठेवला आहे. १०.५ टक्के व्याज दर ठेवला आहे. तसेच  सहा महिन्यानंतर  कर्जाचे हप्ते सुरु होणार आहेत. 
 
लोनचा अर्ज करण्यापूर्वी आपण 567676 वर एसएमएस पाठविण्याची गरज आहे. एसएमएसचा फॉर्मेट या प्रकारचा असेल<PAPL>(Space)<last four digit of your SBI account number>. त्यानंतर आपल्याला एसएमएसला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यावरुन आपल्याला बँक किती कर्ज देणार आहे, याची माहिती मिळेल.
प्रक्रिया आहे अशी : 
मोबाइल फोनमध्ये योनो एसबीआय अॅप डाउनलोड करा.
प्री-अॅप्रुव्ड लोन वर क्लिक करा.
लोनचा कालावधी आणि रक्कम भरा.
एसबीआयकडून आपल्याला रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
त्यानंतर ओटीपीचा सबमिट करा.
ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यात लोनची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.