काय सांगता,बहु स्तरीय मास्क संसर्गाला रोखण्यात 96 टक्के प्रभावी आहे.
योग्यरीत्या तयार केलेला बहुस्तरीय मास्क परिधान केलेल्या व्यक्तीच्या निघणाऱ्या 84 टक्के कणांना प्रतिबंधित करतो, तसेच या मास्क ला परिधान करणारे 2 लोक संसर्गाच्या प्रसाराला किमान 96 टक्के कमी करू शकतात. एका अभ्यासात हे आढळून आले आहेत.
अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांसह तज्ज्ञांनी सांगितले की मास्क तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि याचा घट्टपणा आणि वापरण्यात येणाऱ्या थर नोवल कोरोनाव्हायरस च्या संसर्गाच्या प्रसारावर परिणाम करू शकते. 'एयरोसोल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार विविध पदार्थांपासून अत्यंत सूक्ष्म कण निघणाच्या परिणामाचा अभ्यास केला गेला.
संशोधक नगा ली म्हणाले की सूक्ष्म कण काही तास आणि काही दिवस हवेमध्ये राहू शकतो आणि ते हवेच्या हालचालीच्या मार्गावर अवलंबून असते, म्हणून जर खोलीत हवेच्या निघणाच्या मार्ग व्यवस्थित नाही तर हे सूक्ष्म कण दीर्घ काळ जगू शकतात.
शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात 33 वेगवेगळ्या व्यावसायिकरित्या उपलब्ध सामग्रीची चाचणी केली, ज्यात सूती आणि पॉलिस्टर सारख्या एक-थर ने विणलेल्या कपड्यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, आम्हाला हे कळाले आहे की एकाच प्रकारच्या पदार्थापासून घटकांच्या निघाल्याने विविध परिणाम दिसून येतात.