सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (13:54 IST)

दिवाळी विशेष पदार्थ :चविष्ट बेसन लाडू

सणासुदीच्या दिवसात गोडधोड बनतोच, या दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडूचे महत्त्व आहे, बेसनाचे लाडू सर्वानाच आवडणारा पदार्थ आहे. चला तर मग बेसनाचे लाडू बनविण्याची सोपी पद्दत जाणून घेऊ या. 
 
साहित्य : 
1 वाटी जाड बेसन, 2-3 चमचे साजूक तूप, एक वाटी पिठी साखर, 1 टीस्पून वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे काप (आवडीनुसार), चांदीचा वर्ख (इच्छानुसार).
 
कृती : 
सर्वप्रथम 1 वाटी जाड बेसन 2 मिनिटे भाजून घ्या. सतत हलवत रहा. आता त्यात 2-3 चमचे तूप टाका आणि बेसन हलके तपकिरी होईपर्यंत सतत ढवळत राहा. जेणे करून ते जळणार नाही म्हणून मधेच काळजी घ्या. हे सुमारे 7-8 मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये करा. आता बेसन बाहेर काढून थंड होऊ द्या. आपण कमी-जास्त तूप आणि साखर घालू शकता.
 
आता बेसनात पिठी साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिसळा आणि मधून मधून  ढवळत राहा, थंड झाल्यावर छोटे लाडू बनवा आणि इच्छानुसार चांदीच्या वर्कने सजवा. लक्षात ठेवा की मायक्रोवेव्ह फक्त बेसन भाजण्यासाठी वापरायचे आहे. उर्वरित पद्धत मायक्रोवेव्हच्या बाहेर करा.