गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. देव-देवता
Written By वेबदुनिया|

शंकर

हिंदू धर्मात शंकराला (‍शिव) सर्व देवांत सर्वांत वरचे स्थान आहे. ब्रम्हा-विष्णू-महेश यापैकी महेश म्हणजे शंकर. महेश म्हणजेच शंकर. शंकर ही कलेचीही देवता आहे. त्यालाच नटराज असे म्हणतात. शंकराचा अर्धनारीनटेश्वर अवतार हे याचे निदर्शक आहे.

नीळकंठ व त्रिनेत्र असलेल्या शिवाचे वास्तव्य हिमालयात असते असे पुराणात म्हटले आहे. भैरव, नटराज, दक्षिणमुर्थ्य्, सोमस्कन्ध, पित्क्चदनर हे शंकराचे पाच अवतार आहेत. शंकराची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते.

समुद्रमंथनाच्या वेळी ‍समुद्रातून विष बाहेर आले. त्याचा परिणाम इतरांवर होऊ नये म्हणून ते शंकराने प्यायले. त्या विषामुळे त्यांचा कंठ नीळा झाला. तेव्हापासून त्यांना नीळकंठेश्वर म्हणून ओळखले जाते.

भगवान शंकरानेच हनूमानाचा अवतार घेतला असे मानले जाते. शिवाची पत्नी -पार्वती आहे. गणपती व कार्तिक ही त्यांची दोन मुले. शंकराचे अस्त्र त्रिशूळ आहे. शिवाय त्यांच्या एका हातात नेहमी डमरू असत. त्यांच्या डोक्यावर नेहमी अर्धा चंद्र असतो.

तर जटेतून गंगा वहात असते.पृथ्वीतलावरील मनूष्य जातीचे रक्षण करणे व असूरांचा नाश करणे त्यामुळे त्यांना भोलेनाथ या नावानेही ओळखले जाते. शिवाय शंकराची अध्यात्मिक प्रतिमा कुणाही भक्ताच्या विनंतीला तातडीने धावून जाणारा देव अशीही आहे.

त्यामुळे या भोळ्या शंकराची भक्ती खूप श्रद्धेने केली जाते. शंकराची बारा ज्योर्तिलिंग देशभऱात आहेत. त्यांचे दर्शन घेणे खूप पवित्र मानले जाते.