शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (12:22 IST)

गुरुदेव श्री श्री रविशंकर: मानसिक आणि आध्यात्मिक ताकदीने आव्हानांना सामोरे जा

कोरोना महामारीमुळे खूप दिवसांनी नवीन वर्षाच्या रुपात हर्ष आणि आनंदाची संधी आली आहे....नवी स्वप्ने, नवा उत्साह, नवा उमेद, जेणे करून पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहता येईल.... सर्व प्रकाराचे आव्हाने आणि संकटाला सामोरा जाण्यासाठी… मनात खूप उत्साह, उमंग, उल्लास आणि आनंदाने भरलेल्या गोड हास्याने.. 
 
आम्ही वेबदुनियाच्या दर्शक/वाचकांसाठी आध्यात्मिक जगतातील नामवंत व्यक्तींचे शब्द, संदेश आणि मार्गदर्शन घेऊन आलो आहोत, या मालिकेत श्री श्री पंडित रविशंकर जी यांचा संदेश तुमच्यासाठी सादर करत आहोत....
 
गेली दोन वर्षे मानवांसाठी आव्हानांनी भरलेली आहेत. आम्ही 2022 या नवीन वर्षाचे स्वागत करतो.. पूर्ण उत्साहाने.. धैर्याने.. हारिये न हिम्मत ही एक म्हण आहे.. काळाचे कोणतेही आव्हान असो, मानवी जीवन नेहमीच त्याला सामोरा गेले आहे.. आणि विकासाच्या मार्गावर वाढत आले आहे... याच प्रकारे आमच्या जीवनात अनेक प्रकाराच्या समस्या आल्या आहेत... मानसिक व अध्यात्मिक बळ बळकट ठेवल्याने आम्ही या सर्व आव्हानांवर हसत- खेळत प्रगती करत मात करून घेऊ.... परिस्थिती कशीही असो, त्याला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक बळाची गरज असते....  आपल्याला खंबीर राहण्याची गरज आहे.. 2022 मध्ये आपण हे संकल्प घेऊया की आम्ही विचलित होणार नाही... आपण आपली आत्मशक्ती, आत्मबळ वाढवत राहू आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहू... सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...