शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 2 जानेवारी 2022 (14:42 IST)

कोरोनामध्ये नवीन आजार फ्लोरोनाने दार ठोठावले, गरोदर महिलेला लागण लागली

सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हारस च्या नवीन व्हेरियंट ओमिक्रोनचा सामना करत असताना. आता एका नवीन आजारा फ्लोरोनाने इस्त्रायल मध्ये दार ठोठावले आहे. इस्त्रायल मध्ये या आजाराचे नवीन प्रकरण नोंदले गेले. इथे बाळाला जन्म देण्यासाठी आलेल्या एका गरोदर महिलेत हा आजार आढळून आला आहे. 
वृत्तानुसार, इस्त्राईलच्या गरोदर महिलेला फ्लोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा कोरोनाचा आणि इन्फ्ल्यूएंजाचा दुहेरी संसर्ग असल्याचे सांगितले जात आहे. 
अरब न्यूज ने  ट्विट करून या पहिल्या प्रकरणेची माहिती दिली, इस्राईलचे आरोग्य मंत्रालय या प्रकरणाचा अभ्यास करत आहे. 
इस्रायलच्या राष्ट्रीय आरोग्य प्रदात्यांनी शुक्रवारी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना COVID-19 विरुद्ध चौथी लस देण्यास सुरुवात केली. इस्रायल हा जगातील पहिला आणि सध्या एकमेव देश आहे जिथे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस दिले जात आहेत. इथल्या  वृद्ध रूग्णांसाठी जेरियाट्रिक सुविधांवरील लस मंजूर केली.