शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:10 IST)

अमेरिकन फायझर कंपनीची लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा

फायझर कंपनीने कोरोना व्हायरसविरोधात विकसित केलेल्या लसीच्या क्लिनिकल ट्रायल डाटाचे अंतिम विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार, ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा फायझरने केला आहे. ही लस सर्व वयोगटातील लोकांचे संरक्षण करते. आतापर्यंत 44 हजार लोकांवर या लसीची चाचणी करण्यात आली, असे फायझर आणि त्यांची भागीदार कंपनी बायोनटेक एसईने म्हटले आहे. या रिझल्टमुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देण्यासाठी, परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनी शरीरात कोरोनापासून बचाव करणार्याड घटकांची निर्मिती झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. कोरोनावर इतक्या मोठ्याप्रमाणात परिणामकारक ठरणारी लस उपलब्ध होणार ही चांगली बाब आहे. पण या लसीचे स्टोअरेज करणे हे एक मोठे आव्हान आहे. फायझरने बनवलेली लस नव्या टेक्नोलॉजीने विकसित केली आहे. व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्तीला सक्रिय करण्यासाठी सिंथेटीक एमआरएनएचा वापर केला जातो.