CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना आज,प्लेइंग 11 जाणून घ्या
आयपीएलमध्ये विजयासह पुनरागमन करण्याच्या इराद्याने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ सोमवारी सलग दोन पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध सामना करेल. चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांना आपल्या खेळात सुधारणा करून सुपर किंग्जला पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात करावी लागेल.
सध्याच्या स्पर्धेत सुपर किंग्सचा सर्वात यशस्वी फलंदाज शिवम दुबे आहे ज्याने 160.86 च्या स्ट्राइक रेटने 148 धावा केल्या आहेत. युवा समीर रिझवी संघात पुनरागमन करतो की नाही हे पाहणे बाकी आहे. 20 वर्षीय तरुण फलंदाजाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहा चेंडूत 14 धावा केल्या, पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खाते उघडण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले.
सुनील नारायणला डावाची सुरुवात करणे केकेआरसाठी फायदेशीर ठरत आहे. केकेआरचा चालू हंगामातील सर्वात यशस्वी फलंदाज नारायणला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवणे सुपर किंग्जच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.
हर्षित राणा, रसेल आणि वैभव अरोरा यांनी गोलंदाजीत केकेआरसाठी चांगली कामगिरी केली.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज:रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षाना.
कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Edited by - Priya Dixit